Monday, May 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी रातांबे काढताना पडलेल्या कोतवडे येथील वृद्धाचा मृत्यू

रातांबे काढताना पडलेल्या कोतवडे येथील वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथील वृद्ध रातांब्याच्या झाडाला शिडी लावून चढला अचानक तोल जावून पडले. त्यांच्या डोक्याला मुकामार लागला. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सुरेश आबा मांडवकर (वय ७१, रा. कोतवडे, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध सुरेश मांडवकर हे शुक्रवारी (ता. १५) सकाळी साडेदहाच्या सुमारास रातांब्याच्या झाडावर शिडी लावून रातांबे काढण्यासाठी चढले होते. अचानक त्यांचा तोल जावून ते पडले. त्यांच्या डोक्याला मुका मार लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.