राजीवडा बोट दुर्घटनेतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी:- मांडवी बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ओवेस मक्खी (वय 21) या तरुणाचा मृतदेह सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मिळून आला. ज्या ठिकाणी हि दुर्घटना घडली होती त्याच ठिकाणी मृतदेह मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. गाळात रुतल्याने मृतदेह त्याच ठिकाणी सापडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

राजिवडा येथील इम्रान सोलकर यांची मिनी पर्ससीन बोट जयगड येथील खलील सोलकर यांनी मासेमारीसाठी कराराने घेतली होती. या दुर्घटनेत ओवेस अजूम मखी याला पोहता येत असल्याने तो समुद्रात बुडाला. चौघांना आपल्या बोटीत घेतल्यानंतर बुडालेल्या ओवेसचा शोध घेण्यात आला. परंतु तो काही क्षणात दिसेनासा झाला.

सोमवारी सायंकाळी गाळात रुतलेल्या ओवेसचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ओवेसचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.