दोन अधिकाऱ्यांची बदली; विद्युत विभागाला मिळाला अभियंता
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेतून बदली होवून गेलेल्या मुख्याधिकारी तुषार बाबर यांना राजापूर नगर परिषद मुख्याधिकारीपदी नियुक्ती मिळाली आहे. रत्नागिरी नगर परिषदेतून दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या विद्युत विभागाला अभियंता मिळाले आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेतील अग्निशमन विभागातील महेश साळवी यांची महाड नगर परिषदेत नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर कर निर्धारक तथा प्रशासकीय अधिकारी इंद्रजीत चाळके यांची शेगाव नगर परिषदेत बदली झाली आहे. विद्युत विभागात पंकज वानखेडे यांची नियुक्ती झाली ते अमरावतीतील दर्यापूर नगर परिषदेतून बदली झाले आहेत. सुमारे दीड वर्षापूर्वी विद्युत अभियंता धनंजय चव्हाण यांची गडहिंग्लज नगर परिषदेत बदली झाल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेतील हे पद रिक्त होते ते आता भरले आहे.
रत्नागिरी नगर परिषदेतून बदली झालेल्या मुख्याधिकारी तुषार बाबर यांना राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर नियुक्ती मिळाली आहे. त्यांच्या कार्यकाळात पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठमोठी विकासकामे झाली आहेत. नुकत्याच या सर्वसाधारण बदल्या झाल्या.