कंटेनरमधील नव्या कोर्या 6 गाडयांचे नुकसान
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर नेरकेवाडी येथे कंटेनरला अपघात झाला. या अपघातात कंटेनरमधील 6 नव्या कोर्या करकरीत गाडयांचे नुकसान झाले. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश कुमार प्रल्हादराम गुजर (33,रा. आडवाना, राजस्थान) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक मुकेश गुजर आपल्या ताब्यातील कंटेनर बडोदा (गुजरात) ते गोवा असा चालला होता. या कंटेनरमध्ये 3 अॅस्टर, 3 हेक्टर अशा एकूण 6 नवीन गाडया ट्रान्सपोर्टच्या डिलिव्हरी करता तो घेवून जात होता. शनिवार 12 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वा. च्या सुमारास राजापुरातील नेरकेवाडी येथे आला असता उतारावरील वळणाचा अंदाज न आल्याने कंटेनर डाव्या बाजूला पलटी झाला. या अपघातात चालक मुकेश गुजर हा जखमी झाला. तसेच कंटेनरमधील 6 नव्याा गाडयांचे मोठे नुकसान झाले. या अपघात प्रकरणी स. पोलीस फौजदार प्रमोद वाघाटे यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार कंटेनर चालक मुकेश गुजर याच्यावर भादविकलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.