रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील पाचल येथील दोन जनावरांवर बिबट्याने हल्ला करीत त्यांना ठार मारले आहे. बिबटयाच्या वावरावे पाचल ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, गेले काही दिवस पाचल परिसरात बिबट्या फिरताना अनेकांना दिसला होता. परंतू अद्याप कसलं नुकसान झाल्याची तक्रार वनविभागाला मिळाली नव्हती. परंतू काल दिनांक 14 एप्रिल रोजी पाचल येथील धनगर वाडी येथील पांडुरंग झोरे यांची एक चार वर्षाची गाय व धुळाजी धोंडू कोकरे यांचा एक बकरा यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सदर जनावरे ठार झाली. सदरची बातमी वनविभागाला कळवताच वन अधिकारी श्री घाडगे यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन वनरक्षक श्री सुरज तेली यांना घटनास्थळी पाठवण्यात आले.
सदर घटनेचा पंचनामा करताना वनरक्षक श्री सुरज तेली सह पाचल गावचे सरपंच श्री बाबालाल फरास सर, ग्रामलिपिक सुहास बेर्डे, कल्पेश सुतार, कर्मचारी सुभाष काळे, पांडुरंग झोरे, धुळाजी कोकरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबतची नुकसान भरपाई दीड ते दोन महिन्यात मिळेल असं आश्वासन वनरक्षक श्री सुरज तेली यांनी यावेळी दिले.