राजापूर:- राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची पुणे महानगर पालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागवेर राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी कोल्हापूर महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांची नियुक्ती झाली आहे.
बाबर हे गेली काही वर्षे रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी होते. त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा नगर पालिका जिल्हा सहआयुक्त पदभार होता. तर त्यांनी रत्नागिरी बरोबरच लांजा व राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदीही काम केले होते.









