राजापुराला पुराचा वेढा; वाहतूक देखील ठप्प

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरला पुराने वेढलं आहे. अनेक नद्या भरल्याने वाहू लागल्या आहेत. पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर राजापूरशेजारी असलेल्या लांजा तालुक्यात लोकवस्तीत पाणी शिरलं आहे.

अंजणारी बस स्टॉपजवळील लोकवस्तीत पाणी शिरलं आहे. तीव्र उतरावरील रस्त्याला गटार नसल्याने पाणी वस्तीत शिरल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, लांजा आपत्कालीन कक्षाला सूचना मिळताच सार्वजनिक बांधकाम अधिकारी तलाठी घटनास्थळी पोचले आहेत. खेडमधील जगबुडी, संगमेश्वर-लांजा तालुक्यातील काजळी नदी आणि चिपळूणमधील वशिष्ठ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.