राजापूर तालुक्यात एकाच दिवशी सार्वजनिक ठिकाणी प्रकार
राजापूर:- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवार, दि. ०३ डिसेंबर रोजी सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तब्बल १६ वाहनचालकांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिवसभर विविध ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ही वाहने सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे उभी केलेली आढळली, ज्यामुळे वाहतुकीला आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत होता.
कारवाई झालेल्या वाहनांचा तपशील:
कारवाई झालेल्या वाहनांमध्ये जवाहर चौक ते गणेशघाट रोडवर देसाई कोल्ड्रींक्स समोर आरोपी अजित वसंत शिंदे याच्या ताब्यातील फोर व्हीलर टाटा टियगो गाडी क्र- एम.एच.०५/डी.एच./२४१७, तर गणेशघाट ते जवाहर चौक सार्वजनिक रोडवर डोसानी सेल्स सेंटरजवळ आरोपी विनायक विठ्ठल मटकर याच्या ताब्यातील एक टाटा सुमो गाडी क्र. एम.एच. ०८ झेड ७३९९ उभी आढळली. ओणी बाजारपेठ येथील मुंबई-गोवा हायवेवरील सर्व्हिस रोडवर लांजेकर चिकन दुकानासमोर आरोपी अल्लाउद्दीन बाबा लांजेकर याच्या ताब्यातील एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा मॅक्झीमो गाडी क्रं. एम.एच.४८/टी/१७१३ उभी आढळली.
तसेच, मौजे ओणी बाजारपेठ येथील मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिजखाली आरोपी पुनित विश्वास सावंत याच्या ताब्यातील लालसर तपकिरी रंगाचा आयशर ट्रक क्रमांक एम.एच ०८ डब्ल्यु ८३०९ आणि ओणी येथील सर्व्हिस रोडजवळील बोगद्याखाली आरोपी प्रदिप पांडुरंग डिके याच्या ताब्यातील एक पांढऱ्या रंगाची मंहिंद्रा कंपनीची आय मॅक्स बोलेरो पिकअप वाहन क्र एम.एच ०८ ए.पी ९७२५ उभी आढळली. जवाहर चौक ते जकात नाका जाणारे मुख्य रोडवर हॉटेल विडूमालऊली समोर आरोपी मनोज पांडूरंग बाणे याच्या ताब्यातील एक पांढऱ्या रंगाची मारूती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट डिझायर गाडी क्र. एम.एच.०८/ए.जी./१४१८ उभी केली होती. मुंबई-गोवा हायवेवरील ओणी येथील हायवे ब्रिजखाली सार्वजनिक रोडवर आरोपी शंकर धाकु पटकरे याच्या ताब्यातील सेव्हलोरेट कंपनीची एन्जॉय एलएस चारचाकी गाडी क्र. एम.एच.४३ एआर ०४८१ आणि पाचल फाटा ते सौंदळ जाणारे रोडवर आरोपी संदीप आत्माराम चव्हाण याच्या ताब्यातील एक पिवळ्या रंगाची रिक्षा गाडी नंबर एम.एच.०८/ए.क्यु/१०३३ उभी आढळली.
राजापूर ते ओणी बाजारपेठ येथील मुख्य रस्त्यावर आरोपी तौफिक इब्राहिम इसफ याच्या ताब्यातील एक लाल रंगाची अँपे रिक्षा गाडी नंबर एम.एच.०८/व्ही/१९२९ तर श्रेया दुकाना समोर सार्वजनिक रोडवर आरोपी सुनिल पाडुरंग कोकरे याच्या ताब्यातील टाटा मँझीक गाडी नंबर एम.एच.०८/५१७५ उभी आढळली. तसेच इकरा चिकन सेंटर समोर आरोपी अविनाश अनंत केतकर याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची टाटा मॅक्झीमा गाडी नंबर एम.एच.०८/बी.ई/८११३ आणि ओणी बाजारपेठ येथे आरोपी मोहंम्मद कादिर बोबो याच्या ताब्यातील एक पिवळी टॅक्सी महींद्रा कंपनिची गाडी नंबर एम.एच.०८/५१८० उभी आढळली. राजापूर ते ओणी बाजारपेठ येथे खुशबु इलेक्ट्रॉनिक समोर आरोपी लियाकत इमाम फरास याच्या ताब्यातील महिंद्रा मॅक्स गाडी नंबर एम.एच.०८/५११७ आणि ओणी येथील सर्व्हिस रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आरोपी विलास जानु पळसमकर याच्या ताब्यातील प्लॅटिनम रंगाची मारुती सुझुकी कंपनीची शेवरोले स्पार्क मॉडेल वाहन क्र एम. एच ०२ बी.एम. ९९८७ उभी आढळली.
ओणी ते कोल्हापूर रोडवरील हरळ तिठ्यावरील वळणावर सह्याद्री दर्शन समोरील सार्वजनिक रोडवर आरोपी अनिल शांताराम गुरव याच्या ताब्यातील बजाज कंपनीची अॅटो रिक्षा तिनचाकी गाडी क्र.एम.एच.०७/ बी ५९५२ आणि आरोपी संदिप मधुकर जाधव याच्या ताब्यातील मारुती सझुकी इको गाडी क्र. एम. एच. ४८/ डी.डी/ २१२० उभी करून अडथळा निर्माण केल्याचे स्पष्ट झाले.
या सर्व प्रकरणांमध्ये राजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फिर्यादी म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. या १६ गुन्ह्यांची नोंद गु.र.नं. २२०/२०२५ ते २३५/२०२५ अशी करण्यात आली असून, सर्व गुन्हे राजापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.









