रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील गाडगीळवाडी येथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला शुक्रवार 1 जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये ट्रक पलटी होऊन ट्रक चालक व क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महंमद गफूर वाईद .(२३) व मोहमद सिफायत अली (१६ दोघेही रा. जम्मू काश्मिर ) अशी या जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी प्राथमिक उपचार केले असुन अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरीत पाठविण्यात आले आहे.
गोव्याकडून मुंबईकडे लोखंडी प्लेट भरून हा ट्रक चालला होता. यावेळी गाडगीळ वाडी येथे आल्यावर ट्रक पलटी झाल्याने चालक व वाहक अडकून पडले होते. चालकाचा ताबा सुटला आणि हा ट्रक पलटी झाला. मात्र पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईतुन गोव्याकडे जाणाऱ्या लोकांनी अथक प्रयत्नानंतर दोघानाही बाहेर काढले. पोलीसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.