राजापूर : तालुक्यातील सौदळ मुसलमानवाडी येथे कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. रवींद्र चव्हाण (51), अनिल महादेव दांगट (39, जैतापूर) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, रवींद्र चव्हाण हे 31 ऑक्टोबर रोजी आपल्या ताब्यातील दुचाकीवरून जैतापूर ते कोल्हापूर असा प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ते सौदळ मुसलमानवाडी येथे आले असता सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान टाटा टीगोर कारने रवींद्र चव्हाण यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रवींद्र चव्हाण आणि अनिल दांगट दोघेही जखमी झाले. चव्हाण यांनी याबाबतची फिर्याद राजापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार कार चालक शशांक सौरभ झा (३२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास राजापूर पोलीस करत आहे.