राजापूर:- राजापूर तालुक्यातील कोतापूर गोंडयाची निवई येथे एका शेतकऱ्याच्या घराला व गुरांच्या गोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या आगीत दोन रेडे व एका पाड्याचा मृत्यू झाला.
शेतकरी तुकाराम गोवळकर यांच्या घर व गोठा एकत्रित असलेल्या इमारतीला अचानक आग लागून जळून खाक झाले आहे. यामध्ये तुकाराम गोवळकर यांचे सुमारे सव्वा दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत इमारतीचे पुर्णत नुकसान झाले. दरम्यान येथील पंचायत समिती सदस्य अभिजित तेली यांनी भेट देत त्यांना आर्थिक मदत केली आहे.
बुधवारी तुकाराम गोवळकर यांनी आपल्या शेतातील भाजावळ करून घराकडे गेले होते. मात्र संध्याकाळी अचानक घर व गोठा एकत्रित असलेल्या इमारतीला अचानक आग लागली. घराकडून येत ही आग विझविण्याचा त्यांच्यासहीत तेथील ग्रामस्थांनी पयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. यावेळी रेडयांना बांधलेले दावे सोडले मात्र धुराच्या लोटामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही तरी त्यामधून एक पाडा सुखरूप बाहेर पडला आहे. मात्र या आगीमध्ये औताचे दोन रेडे व एक पाडा मृत्यूमुखी पडला आहे. तसेच शेतील गोठा व घर म्हणून ही इमारत असल्याने जीवनावश्यक वस्तूचा साठी, भांडी वैगरे होती. तीही यामध्ये जळून खाक झाली आहे. त्यामुळे शेतकरी असलेल्या तुकाराम गोवळकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या जळीत पकरीणी पंचनामा करण्यात आला असून सुमारे सव्वा दोन लाख रूपये नुकसान झाले असा पाथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान याची माहीती मिळताच येथील पंचायत समिती सदस्य अभिजित तेली यांनी घटनास्थळी भेट दिली पाहणी केली व पाथमिक गरजा भागविण्यासाठी त्यांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी सरपंच सौ.वंदना चव्हाण, उपसरपंच पमोद जाधव, बादल चौगुले, संदिप जानस्कर, किशोर जानस्कर आदी उपस्थित होते. यावेळी तुकाराम गोवळकर यांना शासकीय स्तरावरून जास्तीच जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन तेली यांनी दिले आहे. तसेच सामाजिक बांधलिकी समजून शेतकरी असलेल्या तुकाराम गोवळकर यांना मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.