रनप मुख्याधिकारी पदावर तुषार बाबर यांची नियुक्ती

रत्नागिरी:- प्रशांत ठोंबरे यांच्या बदलीमुळे मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असणाऱ्या पदावर तुषार बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवस त्यांच्याकडे रनप मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार होता. ठोंबरे यांच्या बदलीनंतर मुख्याधिकारी पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे नजरा असताना या पदावर बाबर यांची नियुक्ती झाली आहे. 
 

तुषार बाबर हे लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी होते व महिला काही महिन्यांपासून ते रत्नागिरी नगरपालिकेचे देखील काम पहात होते. आता मात्र त्यांची आता रत्नागिरी मुख्याधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.