रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सोमवारी 113 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 108 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या पाच जणांपैकी एकजण घंटा गाडी वरील चालक आहे. हा चालक मागील काही दिवस अनेकांच्या संपर्कात आला असल्याचे बोलले जात आहे. यासह रनप कार्यालयातील एका अभियंत्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
सोमवारी दुपारी एकूण पाचजण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर रनप कार्यालयातील कर्मचारी पुन्हा धास्तावले. दुपारनंतर पुन्हा कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे.