रत्नागिरी:-:आमचा पाठिंबा तुम्हालाच असा विश्वास देत वीस नगरसेवकांनी आमदार उदय सामंत यांना आश्वस्थ केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांनी माजी खासदार अनंत गीते यांच्या उपस्थितीत ९ नगरसेवक हे आमच्या सोबत असल्याचा दावा केला व त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले असल्याचे सांगितले. मात्र सोमवारी (ता. 25) सायंकाळी आमदार उदय सामंत यांची २० नगरसेवकांनी शासकीय विश्रामगृह माळनाका येथे भेट घेतली. त्यावेळी २० नगरसेवकांनी आमच्या पाठींबा शिवसेनेत राहुन उदय सामंत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असल्याचा सांगितलं आहे. या घटनेने रत्नागिरीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.









