रनपच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळीच पुकारले कामबंद आंदोलन

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी बुधवारी सकाळपासूनच अचानकपणे काम बंद आंदोलन पुकारले आहे. दोन महिन्यांचा पगार रखडल्याने कामबंद आंदोलन पुकारल्याची माहिती आंदोलनकर्त्या कामगारांनी दिली. कंत्राटी कामगारांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारल्याने बुधवारी सकाळपासून एकही घंटागाडी नगर परिषदेतून बाहेर पडू शकली नाही. याचा परिणाम शहरात जगोजागी कचरा साचलेला होता. आंदोलनकर्त्या कामगारांची भेट घेण्यासाठी नगर परिषदेचे अधिकारी न पोहचल्याने कामगार अधिक आक्रमक झाले होते.