रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक एकतर्फी होईल: ना. केसरकर

रत्नागिरी:– रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांना शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रमोट केले जातेय. राजकीय वर्तूळात त्यांच्या नावाचा जोरदार बोलबालाही सुरू झालेला आहे. किरण सामंत हे आमचे उमेदवार आहेत. ते शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असले पाहिजे, आणि ते होतील, असे आमचे मत आहे. युतीकडून मान्यता देताच ते अधिकृत युतीचे उमेदवार निश्चित होतील असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.

मंत्री दिपक केसरकर रत्नागिरी दौऱयावर असताना त्यांनी येथील शासकीय विश्रामृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेची होणारी ही तर एकतर्फी निवडणूक असल्याचे सांगून टाकले. शिवसेना आणि भाजपा 70-80 टक्के कोकणात आहेत. सद्या आम्ही वेगवेगळे राहतोय म्हणून ठाकरेंच्या एक दोन जागा येताहेत. अन्यथा एकही जागा येणार नसल्याचा टोलाही मंत्री केसरकर यांनी लगावला आहे.

न्यायालयातील आमदार अपात्रता सुनावणी निकालाची साऱयांना पतिक्षा लागलीय. पण मुळात ती अपात्रता नसतेच. एखाद्या बैठकीला गैरहजर राहणे हे कुठल्या कायद्यामध्ये लिहीलेलं नसल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. त्यांचा व्हिप हा पक्षपमुखांनी बजावलेला होता, हा मुद्दा त्यांचा आहे, पण पक्षाची घटनाच मुळात निवडणूक कमिशनरनी नाकारलीय. मग त्यांना अधिकार तो कोणता? असा पश्न उपस्थित करत, अधिकार नव्हता मग महासभा घेतली का? असे अनेक तांत्रिक मुद्दे असल्याचे केसरकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री विधिमंडळाचे नेते, त्यामुळेच त्यांना भेटण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते. विधिमंडळाचे वेगवेगळे कामकाज चालवायचं होतं, राहुल नार्वेकर यांना लपून-छपून करायचे होते तर ते उघड उघड भेटायला का गेले, असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.
सुनावणीचा कायद्यानुसार निर्णय होणार याविषयी शंका नाही. न्यायालयातील अपात्रतेच्या सुनावणीनंतर मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असतील. जरी वाईट वाईट निकाल आला तरी सहा महिन्यात त्यांना पुन्हा निवडून येता येईल, ते आमदार म्हणूनच निवडून येतील, जर कुणाला आपलं नाक कापायचं असेल, तर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात कोणीही जावं. एकनाथ शिंदे शंभर टक्के निवडून येणार आणि तेच मुख्यमंत्री राहणार आमच्या विरोधात निकाल जाणार नाही, अशीच कायदेशीर बाजू ही भक्कम असल्याचे मंत्री केसरकर यांनी विरोधकांना खंबीरपणे सांगितले. आमची बाजू सत्याची असल्यामुळे सत्यमेव जयते हे फक्त आम्हालाच लागू पडतं. उगाच ओरड करतायेत ते सर्व खोटे आहेत, केवळ खोटी सहानुभूती मिळावी म्हणून यांची आरडाओरड सुरू असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
आज आमच्या काळात महाराष्ट्र नंबर एकला आला आहे, याचे पथम उध्दव ठाकरेंनी उत्तर द्यावे. उध्दव ठाकरेंचा आदर ठेवतो, पण त्यांच्या बोलण्याला एक मर्यादा आहे. तुम्ही महाराष्ट्राचा विकास करून दाखवा, आम्ही आमचे काम करतोय. पण त्यावेळी सांभाळून बोला, आम्ही देखील सांभाळून बोलू. आगामी जनता काय ते मतदान करेल असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. तुम्ही तुमची लढाई लढा, आमची आम्ही लढाई लढू. सहानभूमीची लाट फार काळ टिकत नाही. एकदिवशी लोकांना खरं काय त्यांची पचिती येईल असाही टोला केसरकर यांनी लगावला.
न्यायालयातील आमदार अपात्रता सुनावणी निकालाची साऱयांना पतिक्षा लागलीय. आज 10 जानेवारी रोजी लागणाऱया निकालाबाबत मंत्री केसरकर म्हणाले, की सत्यमेव जयते ब्रीदवाक्य आहे, आम्हाला न्याय मिळणार याची आम्हाला खात्री आहे…आमची मेजॉरिटी आहे. आम्ही सर्व कायदेशीर तरतुदींचा पालन केलं आहे. पक्षामध्ये आमची मेजॉरिटी, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आमच्याच बाजूने निर्णय लागेल याची आम्हाला अपेक्षा असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) पवक्ते दिपक केसरकर यांनी सांगितले आहे.