रत्नागिरी:- भारतीय जनता पार्टीने बुथ पातळीपर्यंत बांधणी केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कमिटीने ठरवून दिलेला कार्यक्रम जिल्ह्यात उत्तमरित्या राबविला जात आहे. येणारी कोणतीही निवडणूक लढण्यास आता भाजपा तयार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपचाच उमेदवार लढेल व खासदार होईलअसा विश्वास भाजपाचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. तर लवकरच देशाचे गृहमंत्री ना.अमित शहा यांची कोकणात सभा होणार आहे. हि सभा रत्नागिरीत व्हावी यासाठी आम्ही आग्रही असल्याचे श्री.जठार यांनी सांगितले.
भाजपाचा लोकसभा मतदार संघानिहाय आढावा सुरु आहे. देशातील भाजपा पदाधिकारी, खासदार, मंत्री मतदार संघात जावून केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्यात का हे पहात आहे. प्रथम मंत्री वाडी-वस्तीवर जाऊन योजना अंमलबाजवणीची खातरजमा करत असल्याचे श्री.जठार यांनी सांगितले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.अजय मिश्रा यांच्यावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जबाबदारी आहे. त्यांनी नुकताच मतदार संघाचा दौरा केला आहे. चिपळूण येथून दौर्याला सुुरुवात झाली. चिपळूण ते राजापूर दौरा करताना त्यांनी प्रथम चिपळूण येथे मेळावा घेतला. त्यानंतर श्री क्षेत्र पर्शुराम देवस्थानाला भेट दिली. तेथील परिसर शुशोभिकरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकार्यांना करण्यात आल्या आहे.त्यानंतर त्यांनी वालावलकर ट्रस्टच्या रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी संर्पदंशावरील लस तयार करण्याची परवाणगी देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत केंद्रस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वास ना.मिश्रा यांनी दिल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज्यांचा पुतळा आहे. मात्र तेथे शंभर एकरात छत्रपती संभाजी महाराज्याचा भव्य पुतळा उभारून इतिहासाची माहिती देणारा परिसर निर्माण करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.तर राज्य सरकारने यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तर डॉ.तानाजीराव चोरगे महाविद्यालयाला भेट देवून त्यांनी कृषी क्षेत्रातील माहितीही जाणून घेतली. देवरुख पंचायत समितीत आढावा बैठक घेताना त्यांनी जलजिवन मिशन योजनेचा आढावा घेतला. त्यानंतर प्रत्येक तालुक्याला १५० कोटी रु.या योजनेतून प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.आता जलजिवन मिशनमधून प्रत्येक घरा-घरात पाणी पोहचणार असल्याचे श्री.जठार म्हणाले.
आपत्ती निवारणअंर्तगत कामांसाठी कोकणाला केंद्र सरकारने ३ हजार कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून किनारी भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. निवारा शेड त्यासोबतच पायभूत सुविधा या निधीतून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लांजा तालुक्यातील कोट गावात झाशीची राणी यांचे गाव दत्तक घेण्याची विनंती स्थानिक सरपंचांनी केली आहे. ती मागणी ही ना.मिश्रा यांनी मान्य करुन या गावात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या लागतील त्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचाना दिल्या आहेत. राजापूर हायस्कूलने त्यांची शाळा माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विकसीत केली आहे. तेथे कोकणातील सुसज्ज म्युझियम तयार करण्याच्या दृष्टीकोणातून चर्चा झाली असून केंद्र सरकारने त्यांना निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी ना. मिश्रा यांच्याकडे करण्यात आल्याचे श्री.जठार यांनी सांगितले.