रत्नागिरी:- एमआयडीसीने तळोजा शहर दत्तक घेऊन त्याचा विकास केला हाता. त्या धर्तीवर एमआयडीसी रत्नागिरी शहर स्मार्ट सीटी म्हणून विकसीत होण्यासाठी ४०० कोटीचा निधी मंजूर केला आहे. यातून शहरातील पायाभूत सुविधा मंजबूत केल्या जाणार आहे. शाळा, रस्ते, गटारे आदी कामे घेतली जाणार विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामानंतर शहराचा चेहरामोहरा बदलून जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्राच्या शैक्षणिकक्षेत्रासाठीची एक आनंदाची बातमी आहे.
रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाचे आपले स्वप्न पुर्ण झाल्यानंतर पहिल्याच वर्षीएमबीबीएसच्या पहिल्या बॅचचा निकाल ९९ टक्के लागल्याने हे महाविद्यालय राज्यात पहिले आले आहे. त्यामुळे आपला हेतु साध्या झाला असून भविष्यात रत्नागिरीचे नाव देशपातळीवर नेऊन हे महाविद्यालय एक नंबरात यावे, यासाठी आमचा प्रयत्न असले.आज विविध कामांची आढावा बैठक घेतली. यामध्ये रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी व्हावी, यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. एमआयडीसीने तळोजानावाचे शहर दत्तक घेऊन त्याचा विकास स्मार्ट विकास केला होता. त्याच धर्तीवर रत्नागिरी शहर स्मार्ट शहर व्हावे, यासाठी ४०० कोटीचा
निधी मंजूर केला आहे. रत्नागिरीत स्टरलाईट, वाटद, रीळ-उंडी, राजापूर आदीठिकाणी औद्योगिक क्षेत्र जाहिर झाले आहे. ज्या शहरालगत मोठ्या प्रमाणातऔद्योगिक क्षेत्र आहे, त्या शहराचा विकास एमआयडीसीमार्फत होतो. त्याअनुषंगानेरत्नागिरी शहराचा स्मार्ट सीटी म्हणून विकास केला जाणार आहे.यामध्ये शाळा, रस्ते, ड्रेनेज सिस्टीम यादीचा समावेश आहे. या कामांमुळे रत्नागिरीशहराचा चेरामोहरा बदलणार आहे, असे श्री. सामंत म्हणाले.