रत्नागिरी:- शहर, तालुक्यात वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोरोनाबाधित क्षेत्रांची संख्याही वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन कोरोना बाधित रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधीत करण्यात येतो. आज शहर व तालुक्यात नव्याने 17 कोरोना बाधित क्षेत्रांची भर पडली आहे.
आज रत्नागिरी शहरातील टिळक आळी, टी.जी. शेटयेनगर, गोडबोले स्टॉप, लाला कॉम्प्लेक्स- सिव्हील हॉस्पीटल मागे, माळनाका- एसटी डेपो मागे, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स- डीएसपी बंगल्याजवळ, रघुवीर अपार्टमेंट- आठवडा बाजार, विहार डिलक्स- माळनाका, अशोकनगर- परटवणे येथील तर रत्नागिरी तालुक्यातील मौजे नवानगर भाटये, मौजे चिंचखरी, मौजे महालक्ष्मी मंदीर जवळ खेडशी, मौजे साईनगर कुवारबाव, मौजे कारवांचीवाडी फाटा, मौजे कर्ला खालची गल्ली, जागुष्टे कॉलनी कुवारबाव हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.









