रत्नागिरी:- रत्नागिरी शहराचा पुढील काही वर्षांचा विचार करून कचर्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प व्हावायासाठी 8 कोटी 8 लाख 28 हजार रुपयांच्या सुधारीत आराखड्याला सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली.
नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सर्वसाधारण सभेत सुधारीत आराखड्याला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर हा आराखडा प्रशासकीय मंजूरीसाठी पाठविला जाणार आहे. घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न असल्याने जुन्या घनकचरा प्रकल्प न.प.च्या कार्यक्षेत्रातील मत्स्य उद्योग वसाहत, मंगळवार आठवडा बाजार परिसर, न.प. आवारात व लघुउद्योग परिसरात प्रस्तावित होता. या प्रस्तावित प्रकल्पातील आवश्यक असणारी यंत्रणा घंटागाड्या यापूर्वीच खरेदी केल्या आहेत. या सर्व तयारीसाठी 4 कोटी 51 लाख 66 हजार रुपयांची तरतुद होती. यापैकी 2 कोटी 96 लाख 36 हजार रुपये इतका निधी अखर्चीत आहे. तसेच अचानक शहरातील जागेमध्ये घनकचरा व्यवस्थापन जिल्हा समितीची मंजूरी घेणे आवश्यक होते.शहरात ज्या ठिकाणी जुना प्रकल्प प्रस्तावित होता. ते सर्व परिसर गर्दीच्या परिसरात असल्याने येथे जमणार्या कचर्याच्या नगारिकांना त्रास होण्याची शक्यता होती. त्याचवेळी दांडेआडोम येथील रत्नागिरी न.प.च्या मालकीचा 2.46 हेक्टर क्षेत्रफळाची जागा घनकचरा प्रकल्पासाठी आरक्षित होती. ती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उपलब्ध झाला आहे. ही जागा मोठी असल्याने आरोग्य सभापती निलेश नायर यांनी प्रकल्पाचा आवाका वाढवण्याचा निर्णय घेतला. सुधारित आराखड्याला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत.









