रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनाने काल पालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर केली. यामध्ये प्रभाग ६ मधील काही भाग काढून नवीन प्रभाग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तेथून पुढील प्रभागांमध्ये बदल झाला आहे. काही नवीन भाग या प्रभागांना जोडला आहे. एकूण १६ प्रभागांमध्ये प्रभाग क्र. ९ आणि १५ हे सर्वांत मोठे प्रभाग असून त्याची लोकसंख्या ५ हजार १३९ एवढी आहे.
अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रभागांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग ९ ची लोकसंख्या ५ हजार १३९ आहे. यामध्ये गोखलेनाका, धनजीनाका, उर्दू शाळा, सिद्धीविनायक अपार्टमेंट, ओम एन्क्लेव्ह अपार्टमेंट, मेहत्तर चाळ, पोलिस हेडकॉटर्स उजवीकरडील घरे, मेन्टल हॉस्पिटल सुपरिडेन्ट यांचा बंगला, श्रीराम मंदिर आणि मारूती देऊळ यांचा समावेश आहे. प्रभाग क्र. १० ची लोकसंख्या ४ हजार ९९५ आहे. यामध्ये शेरेनाका, खांडेकर यांचे घर, हेडपोस्ट ऑफिस, नवीन भाजीमार्केट, पऱ्याची आळी, टिळकआळीचा काही भाग, घाणेकर आळी, बंदररोड, मुरलीधर मंदिर समाविष्ट करण्यात आलाय. प्रभाग क्र. ११ ची लोकसंख्या ४ हजार ९६७ आहे. यामध्ये झाडगाव झोपडपट्टी, झाडगाव गुरांचा दवाखाना, जोशी पाळंद, कलावती मंदिर, फाटक हायस्कूल, लक्ष्मी चौक, शेरेनाका उजवी बाजू, टिळक आळी गणपती मंदिर, टिळक आळी काही भाग, टिळक स्मारक उद्योजक वसाहत, खालची आळी, भैरी मंदिर अशी रचना आहे.
प्रभाग क्र. १२ ची लोकसंख्या ४ हजार ८९३ आहे. यामध्ये पंधरामाड, रेमंड रेस्टहाऊस, घसरवाट, पांढरा समुद्रनाका, मुरूगवाडा काही भाग, हंजर आईस फॅक्टरी, मुरुगवाडा झोपडपट्टी, हार्बर गेस्टहाऊस, मेरीटाईम बोर्ड समाविष्ट आहे. प्रभाग क्र. १३ लोकसंख्या ४ हजार ६१८ आहे. यामध्ये मिरकरवाडा जेटी पोलिस चौकी, दांडा फिशरीज, मत्स्योउद्योग वसाहत, कावळेनाका, शाळा क्र. १०. तर प्रभाग क्र. १४ ची लोकसंख्या ५ हजार ११३ आहे. यामध्ये भगवती मंदिर, भगवती बंदर, पठाणवाडी खडपमोहल्ला सांब मंदिर, कुरणवाडी, भाटकरवाडा, सांबवाडी, लाईट हाऊस, मालुसरेघाटी, भाग्येश्वर मंदिर, शाळा क्र. ९ दसपटवाडी, नाना सुर्वे शाळा आणि मांडवीचा काही भाग आहेत. प्रभाग क्र. १५ ची लोकसंख्या ४ हजार ९६१ आहे. हा प्रभाग भडंग नाका, गांधी कॉलनी, पटवर्धन हायस्कूल, मारूती आळीचा काही भाग, एसटी स्टॅण्ड, कलेक्टर कम्पाउंड, खडपेवठार, घुडेवठार, दत्तमंदिर पाटीलवाडीने बनला आहे. प्रभाग क्र. १६ ची लोकसंख्या ४ हजार ६२७ आहे. यामध्ये जयस्तंभ जावकर प्लाझा, नगर पालिका कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, लाला कॉम्प्लेक्स, गोगटे कॉलेज, विश्वेश्वर घाटी उजवीकडील भाग, राजिवडा बंदर, टेक्निकल हायस्कूल चक्री रस्ता या भागांचा समावेश आहे.