वसुलीचे उद्दिष्ट केवळ ५० टक्के पूर्ण
रत्नागिरी:- घरपट्टी वसूलीसाठी पालिकेच्या वसूली पथकाने कठोर पावले उचलायला सुरवात केली आहे. कर चुकवेगीरी करणाऱ्या शहरातील ९८ मालमत्ता या विभागाने सील केल्या आहेत. तर ७७ नळ जोडण्या तोडल्या आहे. एकुण १४ कोटी घरपट्टी कर वसूलीपैकी आतापर्यंत ७ कोटी ३५ लाख रुपये वसूल झाले आहेत. आतापर्यंत फक्त ५० टक्केच्या वर कर वसुली गेली आहे. यापुढे पालिकेची कारवाई सुरू राहणार असल्याचे पथकांनी इशारा दिला.
रत्नागिरी पालिकेच्या हद्दीमध्ये सुमारे तीस हजार इमले धारक आहेत. या इमलेधारकांकडुन १४ कोटी घरपट्टी वसुली केली जाते. कोरोनाकाळातील थकबाकी धरून यंदा १४ कोटी कर वसुलीचे उद्दीष्ट पालिकेसमोर आहे. कर वसुलीसाठी पालिकेने इमलेधारकाना सुवरवातील नोटीसा काढाल्या त्यानंतर रिक्षा फरवून ध्वनिक्षेपकावरून सूचना आणि इशारा दिला. तरी अनेक करदात्यांनी घरपट्टी भरलेली नाही. आर्थिक वर्षातील हा अखेरचा महिना संपत आला तरी अजून ५० टक्के घरपट्टी वसुलीचे उद्दीष्ट पालिकेसमोर आहे. या वसुलीसाठी ८ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांकडुन आतापर्यंत कर न भरणाऱ्या ९८ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. तर ७७ जणाची नळ जोडणी तोडण्यात आली
आहे.
भरारी पथकांद्वारे ही कर वसूलीसाठी ही कठोर कारवाई सुरू आहे. पालिकेचे वसूलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना वारंवार सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वसूली पथके घरोघरी जाऊन वसूली करत आहेत. वसूलीचा हा आकडा ७० टक्केच्या वर जाणे अपेक्षित होते. परंतु तो अजून ५० टक्केवरच आहे. त्यामुळे पालिकेची ही वसुली मोहिम अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे.









