रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी संजय जैन यांचे निधन

रत्नागिरी:- शहरातील राम आळी येथील भारत नॉव्हेलटी हाऊस दुकानाचे मालक संजय भुरमलशेठ जैन (वय 50) यांचे सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. 

रत्नागिरीतील एक हरहुन्नरी व गरजूंच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. आपल्या फिटनेस बाबत ते नेहमी जागरूक असत  पण आज अखेर या तरुण व्यक्तिमत्वाची जीवन यात्रा संपली. संजय जैन यांच्या निधनाने रत्नागिरी व्यापारी वर्गात शोककळा पसरली आहे. आज दुपारनंतर त्यांचे पार्थिव रत्नागिरीत आणण्यात येणार आहे.