रत्नागिरी:- शहरातील खालची आळी येथील प्रौढाने अर्धवट स्थितीतील बांधकामाच्या शिगेला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.
जितेंद्र तुकाराम खाके (वय ५०, रा. खालची आळी, रत्नागिरी) ही घटना दुपारी तीनच्या सुमारास निदर्शनास आली. मिळालेल्या माहिती नुसार मयत खाके यांना मद्याचे व्यसन होते. ते गवंडी काम करत होते. मागील दोन दिवस बेपत्ता होते. मात्र त्या बद्दल शहर पोलिस ठाण्यात नोंद नव्हती. खालची आळी येथील लघु उद्योग वसाहत येथील रान वाढलेल्या ठिकाणी राजेंद्र रामचंद्र खापे यांचे घराच्या अपुर्ण बांधकामाच्या शिगेला जितेंद्र खाके यांनी नायलॉनची जाडी दोरी बांधुन पायाखाली दगड ठेऊन गळफास घेतला. या प्रकरणी राजेंद्र खापे यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबर दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला असून मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरु होती.