रत्नागिरी:- शहरातील न्यायालयाच्या समोर मोटारीला दुचाकीने मागून धडक दिली. संशयित स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश इंद्रसेन पाटील ३०, व इंदसेन गोपीनाथ पाटील (दोघे रा. भंडारपुळे, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. २५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास न्यायालयाच्या समोरील मेन गेट जवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनेश विंचुकर हे पत्नी दिक्षा हिच्यासह त्यांच्या मालकीच्या मोटार (क्र. एमएच-०४ ई एच ५२००) घेऊन वायगणी ते साळवी स्टॉप येथे जात असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमरास मागून येणाऱी दुचाकी (क्र. एमएच-४३ सीएफ ७४९०) वरिल चालकाने ठोकर देऊन अपघात केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल दिनेश हरचकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.