Sunday, July 12, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी नाखरे येथील प्रौढ बेपत्ता; महिना उलटूनही शोध सुरू

रत्नागिरी नाखरे येथील प्रौढ बेपत्ता; महिना उलटूनही शोध सुरू

रत्‍नागिरी:- तालुक्यातील नाखरे येथून एक महिन्यापूर्वी प्रौढ बेपत्‍ता झाल्याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अजूनही त्‍याचा कोणताही ठावठिकाणा समजून आलेला नाही.

  भगवान कृष्णा मांडवकर (45, रा.नाखरे कालकरकोंड,रत्‍नागिरी) असे बेपत्‍ता प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्‍याची पत्‍नी प्राजक्ता मांडवकर हिने पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्‍यानुसार, तिचा पती भगवान मांडवकर हा 9 जून 2026 रोजी रात्री 9 वा. राहत्‍या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेला आहे. त्‍याच्या पत्‍नीने त्‍यांचे नातेवाईक, मित्रपरीवार तसेच गावात शोध घेउन 27 जून रोजी पूर्णगड पोलिस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याबाबत खबर दिली आहे. जवळपास एक महिना होउनही भगवान मांडवकर यांचा कोणताही ठावठिकाणा समजून आलेला नाही.