रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने आपल्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नऊ उमेदवार शनिवार 15 नोव्हेंबर रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत नऊ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे निवडणूक प्रभारी यशवंत जाधव, आमदार किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित उपस्थित होते. जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून निमेश नायर, प्रभाग 3 राजन शेट्ये, प्रभाग 5 सौरभ मलुष्टे, प्रभाग 7 गणेश भारती, प्रभाग 7 श्रध्दा हळदणकर, प्रभाग 8 दतात्रय साळवी, प्रभाग 9 विजय खेडेकर, प्रभाग 13 सुहेल साखरकर आणि 13 मधून आफरीन होडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.









