रत्नागिरी:- सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी नगरपरिषद व चिपळूण नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महिला सर्वसाधारण पडले आहे. त्यामुळे महिला सर्वसाधारण मधून आता महिला नगराध्यक्ष पदी बसणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे पुरुष विभागातून इच्छूक असलेल्यांची खंंत वाटणे साहजिकचे आहे. तसेच चिपळूण नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने चिपळूणमध्ये मात्र आता सर्वपक्षीय चढाओढ निर्माण होणार आहे.
रत्नागिरीतून नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून शिल्पा सुर्वे, शितल पावसकर, उज्वला शेट्ये, शिल्पा पटवर्धन, वर्षा ढेकणे तर माजी नगराध्यक्ष मिलींद किर यांच्या सौभाग्यवती हिमानी मिलींद किर, दिलंशाद दिलावर गोदड यांचे नाव महाविकास आघाडीकडून चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीतर्फे रमेश कदम आणि महायुतीतर्फे उमेश सकपाळ हे चर्चेत आहेत. आता आरक्षण जाहीर झाल्याने रत्नागिरी व चिपळूणमध्ये निवडणूकीची धुळवड सुरु होणार आहे.