रत्नागिरी:- शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात नव्याने 38 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआर टेस्ट केलेले सर्वाधिक 33 तर अँटिजेन टेस्ट केलेल्या 5 जणांचा समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी रात्री नव्याने 38 रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये शिवाजीनगर येथील 4 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय पावस 1, कारवांचीवाडी 1, साळवी स्टॉप 2, कुवारबाव 2, कर्ला 1, चिपळूण येथील 1 डॉक्टर, एमआयडीसी 1, के सी जैन नगर 1, बावनदी 1, जोशी पाळंद 1, कडवई 1, सावर्डे 1, केळ्ये 1, नाचणे रोड 1, गयाळवाडी 1, खेडशी 3, सन्मित्र नगर 2, डीएसपी बंगला नजिक 1, साईनगर 2, सिविल नर्सिंग हॉस्पिटल 1, टीआरपी 1, पाली 2, तेली आळी 1, भाट्ये 1, शिरगाव 1 आणि अभ्युदय नगर येथे 1 रुग्ण सापडला आहे.