रत्नागिरी:- ग्रामीण व शहरी भागातील सार्वजनिक ठिकाणी वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल असे वाहन लावून ठेवणाऱ्या संशयित चालकांविरुद्ध ग्रामीण व शहरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेश धोंडू गोरे (वय ४९, रा. आदीशक्ती नगर, कारवांचीवाडी, रत्नागिरी), अमोल रमेश शिरधनकर (वय ४५, रा. अलावा, जाकीमिऱ्या रत्नागिरी), असलम फत्तेमोहम्मद खान (वय ३७, रा. एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी), राम मिलन (वय २६, रा. मालगुंड, बळीराम पारकर विद्यालय जवळ, रत्नागिरी) अशी संशयित चालकांची नावे आहेत. या घटना मंगळवारी (ता. १) रात्री नऊ ते दहाच्या सुमारास गयाळवाडी, मच्छीमार्केट , धनजी नाका, मालगुंड बाजारपेठ येथे निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांनी सार्वजनिक ठिकाणी वाहतूकीस व रहदारीस अडथळा निर्माण होईल असे टेम्पो, दुचाकी वाहन लावून ठेवले. या प्रकरणी
पोलिस शिपाई प्रशांत बंडबे, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कांबळे, आशिष भालेकर, पोलिस शिपाई निलेश गुरव यांनी शहर, ग्रामीण व जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









