रत्नागिरी शहरात 11, कारवांचीवाडीत सापडले 7 कोरोना बाधित

रत्नागिरी तालुका ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुका सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालांमध्ये एकट्या रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 35 रुग्ण सापडले आहेत. यापैकी रत्नागिरी शहरात 10 तर कारवांची वाडी येथे 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 

शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नवे 85 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यापैकी एकट्या रत्नागिरी तालुक्यात 35 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या 35 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक 7 रुग्ण कारवांचीवाडी येथील आहेत. याशिवाय कोकण नगर येथील 3, लक्ष्मी चौक गाडीतळ येथील 4 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय पूर्णगड येथे 2 रुग्ण सापडले आहेत. तसेच शांतीनगर, कापडगाव, कुवारबाव, साखरपा, भडकंबा, आंबेशेत, पोलीस स्टेशन रत्नागिरी, गोडबोले स्टॉप, थिबा पॅलेस, हर्णे, जयगड, तेली आळी, देवुड, राजापूर (ऍडमिट), भाट्ये, दापोली (ऍडमिट) आणि कासारवेली येथे नवे रुग्ण सापडले आहेत.