रत्नागिरी:- कोरोना महामारीच्या गंभीर प्रसंगी आम्ही आरोप-प्रत्यारोप करीत बसलेलो नाही, तर काम करून दाखवतो. शिवसेनेने संघटना म्हणून सामाजिक बांधिलकेचे भान ठेऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तिन्ही जिल्ह्यांसाठी 150 ऑक्सिजन काँसिंनट्रेटर मशिन दिली. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला 50 ऑक्सिजन मशिन मिळली आहेत. एवढेच नाही; तर 50 रेमडिसिव्हर इंजेक्शनही दिले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकाीर लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते.
ते म्हणाले, राज्याचे पर्यटन मंत्री आदीत्य ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये या महामारीच्या काळात शिवसेना संघटना म्हणून काहीतरी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात 150 ऑक्सिजन काँसिंनट्रेटर मशिन देण्यात आल्या. राज्यासह जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट कायम आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा राबत आहेत. तिसर्या लाटेचीही शक्यता वर्तविली जात आहे. ही लाट थोपविण्याच्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. महामारीत आम्ही बोलत बसलो नाही. परंतु शिवसेना संघटना म्हणून करून दाखविले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेकडुन कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना 150 ऑक्सिजन मशिन पुरविण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याला 50 या प्रमाणे त्याचे वाटप केले आहे. प्रातिनिधक स्वरूपात आज ते रत्नागिरी जिल्ह्याला देण्यात आले. जिल्ह्याला मिळालेल्या 50 ऑक्सिजन मशिनपैकी खेड 10, चिपळूण 10, रत्नागिरी 10, राजापूर 10 आणि मंडणगड 10 असे त्याचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्याला रेमडिसिव्हर इंजेक्शनाचा तुटवडा भासू नये, यासाठीही प्रयत्नशील आहे. आता जिल्ह्यात रेमडिसिव्हर इंजेक्सन कमी प्रमाणात आहेत. म्हणून शिवसेेना संघटनेकडुन 50 रेमडिसिव्हर इंजेक्शन देण्यात आली आहेत. त्याचे समान वाटप करण्यात येणार आहे, असेही श्री. सामंत म्हणाले.