रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी २२६ तर ९ पंचायत समितींच्या एकूण ११२ जागांसाठी ४४४ अर्ज दाखल झाले होते. यापैकी जि. प. साठी ४९ तर पं.स. साठी १०१ उमेदवारांनी निवडणूकीच्या रिंगणात पळ काढला आहे. सर्वच पक्षातील डावललेल्या इच्छुक व नाराजांनी इर्षेने पेटून निवडणूक लढवायचीच असा चंग बांधला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली दिसून आली होती. तर काही ठिकाणी बंडोपंतांना शांत करण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक तहसील कार्यालयासमोर अर्ज दाखल करण्यासाठी मोठी धामधुम सुरु होती. अनेक ठिकाणी डावललेल्या उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये बंडोखोरीचा पेव फुटला होता.
अर्ज छाननी झाल्यानंतर मंगळवारपर्यंत (दि.2?२७) अर्ज मागे घेण्याची मुदत होती. दुपारी ३ वाजता मुदत संपली. त्यानुसार जि.प. च्या ४९ जणांनी तर पं. स. च्या १०१ उमेदवारांनी निवडणूकीचे मैदान सोडल्याचे चित्र स्पष्ट झाले. जिल्ह्यात सर्वात बंडखोरीचा फटका हा चिपळूण, संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्याला बसला आहे.
संगमेश्वर (ता.): ३ (जि. प. गट) : १० (पं. स. गण), लांजा (ता.) : ४ (जि. प. गट) : ५ (पं. स. गण), रत्नागिरी (ता.) : ८ (जि. प. गट) : ८ (पं. स. गण), मंडणगड (ता.) : ६(जि. प. गट) : ६ (पं. स. गण), राजापूर (ता.) : ४ (जि. प. गट) : १६ (पं. स. गण), चिपळूण (ता.) : ६ (जि. प. गट) : १५ (पं. स. गण), गुहागर (ता.) : २ (जि. प. गट) : ३ (पं. स. गण), खेड (ता.) : ८ (जि. प. गट) : १३ (पं. स. गण), दापोली (ता.) : ८ (जि. प. गट) : २५ (पं. स. गण)
एकूण (ता.) : ४९ (जि. प. गट) : १०१ (पं. स. गण)









