रत्नागिरी:- शहरातील गवळीवाडा येथील प्रौढाने रागाच्या भरात गळफास घेतला. नातेवाईकांनी तात्काळा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. प्रदीप प्रकाश रजपूत (वय ४४, रा. दत्तमंदिरजवळ, गवळीवाडा, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप हा घरात असताना तू पहिला जेवून घे त्यानंतर तूला काय करायचे ते कर असा तगादा लावला गेला. या रागातून प्रदिपने घरातील हॉल मधील लाकडी वाशाला फॅनच्या हुकाला घरातील वापरती नायलॉनच्या साडीचा मधल्या भागाचा गळफास घेतला. नातेवाईक व शेजाऱ्यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.