रत्नागिरी : काल सकाळी 8.30 वाजल्यापासून आज सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी 132 मिमी तर फक्त रत्नागिरी तालुक्यात 274 मिमी म्हणजे 11 इंच पावसाची नोंद झाली. मे महिन्यातील ही विक्रमी नोंद आहे. या वादळी पावसाने हजारो घरांसह लाखो रुपयांचे नुकसान झाले.
राजापूर तालुक्यात सर्वात कमी 208 मिमी, लांजा तालुक्यात 162 मिमी, संगमेश्वर तालुक्यात नुकसान झाली. गुहागरात 120 मिमी पाऊस झाला आहे. काल दुपारी 2 वाजल्यापासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजता सूर्यदर्शन झाले.