रत्नागिरीत सीएनजी गॅसचा प्रचंड तुटवडा; रिक्षा व्यावसायिक हैराण 

रत्नागिरी:- सीएनजी गॅसच्या तुटवड्याने जे. के. फाइल्स येथील मुख्य पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यात गॅसला अपेक्षित प्रेशर मिळत नसल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. याबाबत गेली दोन ते तीन दिवस रिक्षा व्यवसायिकांना गॅस भरण्यासाठी रांगेमध्ये अडीच ते तीन तास ताटकळत उभा राहावे लागत आहे. अशोका गॅस कंपनीने तत्काळ त्यावर उपाययोजना करावी अशी, त्यांची मागणी आहे.

डिझेल-पेट्रोलचे भाव आता गगनाला भिडले आहे.  त्यामुळे वाहनधाराकंना इंधन परवडणारे राहिलेले नाही. त्यामुळे त्याला सीएनजी गॅस हा पर्याय निघाला. रत्नागिरीमध्ये पहिला अशोका कंपनीचा पहिला सीएनजी गॅस पंप झाला. त्यानंतर जिल्ह्यात ठिकाठिकाणी त्याची केंद्र उभारण्यात आली. सीएनजीचा पर्याय मिळाल्याने सीएनजी वाहनाकडे कल वाढला. त्यात कंपनीने रिक्षा व्यवसायिकांसाठी काही योजना जाहिर केल्याने अनेकांनी रिक्षा घेतल्या. मात्र आता सीएनजी गॅसची मागणी वाढल्याने तक्रारी वाढुत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः जे. के. पाइल येथील मुख्य पंपावरही वाहनांची गर्दी होताना दिसत आहे. गेली तिन दिवस पंपावर सीएसजी गॅसचा तुटवडा भासत आहे.

रिक्षा व्यावसायिकांना गॅस भरण्यासाठी सुमारे अडीच ते तीन तास रांगेत उभा रहावे लागत आहे. मुख्य पंपावर ही समस्या असल्याने अन्य ठिकाणी काय परिस्थिती असले, असा सवाल वाहनधारकानी उपस्थित केला आहे. तसेच जो गॅस मिळत आहे, त्याला अपेक्षित प्रेशर (दाब) नाही. त्याचा तोटा वाहनधारकांना बसतो. कंपनीने तत्काळ यावर मार्ग गॅस तुटवड्याची जी समस्या निर्माण झाली आहे ती दूर करावी, अशी मागणी वाहनधारकांची आहे. दोन दिवसानंतर आज सायंकाळी कंपनीचा गॅस पुरवठा पुर्ववत होताना दिसत आहे.