रत्नागिरी:- गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत सकल हिंदू समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडोंच्या संख्येने रत्नागिरीकर सहभागी झाले होते.
जम्म-काश्मिर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा त्यामध्ये समावेश होता. अत्यंत निघृणपणे गोळ्या झाडून या दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्त्या केली. या घटनेनंतर संपूर्ण भारतात संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या. या हल्ल्याचा निषेध म्हणून देशभरात आक्रोश मोर्चे सुरू झाले आहेत. असाच आक्रोश मोर्चा शुक्रवारी रत्नागिरीत निघाला.
सकल हिंदू समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चाची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास या मोर्चाला गाडीतळ, लक्ष्मीचौक येथून सुरूवात झाली. स्वा. सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला.
या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. हातात भगवे झेंडे आणि पाकिस्तान विरोधी फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खून का बदला खून से लेंगे, अशा गगनभेदी घोषणा यावेळी मोर्चेकर्यांनी दिल्या. गाडीतळ परिसरात झालेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
हा मोर्चा गोखले नाक्यातून मारुती आळी मार्गे जाणार असल्याने पोलिसांनी मारुती आळी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांची विशेष पथके साध्या वेशात लक्ष ठेवून होती तर १० ते १५ पोलिसांचे कॅमेरे या मोर्चावर लक्ष ठेवून होते.
या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. जात बघून नव्हे तर धर्म विचारून निष्पापाना गोळ्या घातल्या. अशा जिहाद्यांचा नायनाट झालाच पाहिजे अशी मागणीदेखील अनेक मोर्चेकर्यांनी लावून धरली होती.
पहेलगाम येथील गोळीबाराची दृष्ये पाहून सार्यांचेच हृदय हेलावून गेले होते. शुक्रवारी रत्नागिरीत निघालेल्या मोर्चात तिखट प्रतिक्रीया अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. जो देश दुसर्यावर अवलंबून असून तोच देश पाण्यासाठी भारताकडे भिक मागत आहे.
हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दाखल झाल्यानंतर त्याच ठिकाणी एक बाजूचा रस्ता मोर्चेकर्यांनी बंद केला आणि त्या ठिकाणी सभेला सुरूवात झाली. छत्रपती संभाजी नगर येथून आलेल्या सकल हिंदू समाजाच्या वक्त्या हर्षू ठाकूर यांनी या मोर्चाला संबोधित केले. या मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील तितक्याच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या जिहाद्यांना संपवायचे असेल तर आता आर्थिक व्यवहार आपण कोणासोबत करायला पाहिजेत हे सर्वांनी समजून घ्यायला हवे. त्यांची आर्थिक नाडी दाबली तरच ते जिहादी उद्ध्वस्त होतील असे सांगून यापुढे भाईचारा वगैरे अशा भूलथापांना बळी पडू नका. जातपात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई असे सांगून या मोर्चाची सांगता करण्यात आली.