रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा ते पेठकिल्ला जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी वाहतूकीस अडथळा होईल असे पार्क करणाऱ्या चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. विशाल दिपक जाधव (वय २७, रा. राजयोग विहार, ए विंग, नाचणे-रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ११) रात्री साडेसातच्या सुमारास मिरकरवाडा ते पेठकिल्ला जाणाऱ्या रस्त्यावर राजेश पानशॉप येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विशाल जाधव याने दुचाकी (क्र. एमएच-१० डीएस ४६७६) ही वाहतूकीस अडथळा होईल अशी पार्क केली. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार सोनल शिवलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.