रत्नागिरीत रेल्वे रुळावर टिके येथील तरुणाची आत्महत्या

कारण अद्याप अद्याप अस्पष्ट

रत्नागिरी:- रत्नागिरी कुवारबाव येथील शांतीनगर रसाळवाडी नाचणे येथे रेल्वे रुळावर तरुणाने रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रणव कृष्णा सनगरे (24, टिके, भातडेवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची खबर प्रतीक पवार यांनी पोलीस स्थानकात दिली.

या तरुणाचे चार महिन्यापूर्वीच म्हणजे मे महिन्यातच लग्न झाले होते. काल शुक्रवारी 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी या तरुणाने रेल्वे रुळावर रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याचा मृतदेह शव विश्चेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात होता. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करत आहेत. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.