रत्नागिरीत महायुतीत फूट; अजित पवार गट नगराध्यक्ष पदासाठी मैदानात

नगरसेवक पदाच्या जगदेखील लढवणार

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडला आहे. अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत बशीर मुर्तुझा यांची पत्नी वहिदा मुर्तुझा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते बशीर मुर्तुझा यांनी आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह आणि कार्यकर्त्यांसह पक्ष सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

​बशीर मुर्तुझा यांनी तातडीने राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत रत्नागिरीच्या राजकारणात मोठा ‘ट्विस्ट’ निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, राज्यात अजित पवार गट महायुतीचा घटक असला तरी, रत्नागिरीत मुर्तुझा यांचा गट महायुतीमधूनही बाहेर पडून नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या अनेक जागा स्वतंत्रपणे लढवणार आहे.

​बशीर मुर्तुझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासोबतच, सुमारे १० प्रभागांमधून अजित पवार गटाचे उमेदवार उभे करण्याची तयारी देखील युद्धापातळीवर सुरू करण्यात आली आहे.