रत्नागिरीत मटका चालविणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील नगर परिषद इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या दुकान गाळ्यात मटका जुगार चालविणाऱ्या संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. प्रकाश महादेव कदम (६३, रा. कदमवाडी आरे रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे साहित्य व ५३० रुपये इतकी रोख रक्कम हस्तगत केली आहे.

पोलिसांनी माहितीनुसार, दिलेल्या नगरपरिषद इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या दुकान गाळ्यात अवैध असलेला मटका जुगार चालविला जात आहे. अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी संशयित आरोपी हा लोकांकडून पैसे स्वीकारुन मटका जुगार चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपी याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनिमय कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.