रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर येथील प्रौढाचा श्वास घेताना त्रास होऊ लागल्याने आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवार २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वा. सुमारास घडली. प्रमोद मारुती ठिक (४२, रा. आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
गुरुवारी प्रमोद हा आजारी असल्याने घरी आराम करत होता. त्यावेळी त्याला अचानकपणे श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्याच्या नातेवाईकांनी त्यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी प्रमोदला तपासून मृत घोषित केले.









