रत्नागिरी:-वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या वातावरणात अचानक बदल झाला आहे. दुपारी तीननंतर ढगाळ वातावरण तयार झाले. विजांच्या लखलखाटासह ढगांच्या कडकडाटात वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळाची तीव्रता आणखी 2 दिवस राहण्याची शक्यता आहे.
उद्या पहाटे रत्नागिरी किनारपट्टीवर तोक्ते वादळ धडकण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर अपेक्षेप्रमाणे वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात वीजप्रवाह खंडित झाला आहे असे असले तरी वाऱ्याचा वेग मात्र कमी आहे हे वादळ उद्या पहाटे रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे