पालकमंत्री उदय सामंत; तुषार साळवींचे कौतुक
रत्नागिरी:- गाव तेथे युवासेनेची शाखा हा उपक्रम घेऊन तळागाळातील युवकांशी संपर्क साधला जात आहे. त्याची सुरवात कुरतडे भाटकरकोंड येथील शाखेच्या उद्घाटनाने झाला आहे. याच पध्दतीने मतदारसंघातील प्रत्येक गावात शाखा सुरु करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. तसेच ही मोहिम यशस्वी करण्यासाठी झटणारे युवासेनेचे तालुकाप्रमुख तुषार साळवी आणि अन्य पदाधिकार्यांचे कौतुक केले.
रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे भाटकरकोंड येथील शाखेचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या वेळी उद्योजक अण्णा सामंत, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, महिला आघाडीच्या कांचन नागवेकर, युवा सेना तालुका प्रमुख तुषार साळवी, बबलु कोतवडेकर, युवा सेनेचे प्रशांत चाळके, समीर भाटकर, गणेश शिंदे, औंदुबर कळंबटे, विक्रांत कीर, यांच्यासह युवासेनेचे पदाधिकरी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी मंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विकासकामे वेगाने होत आहेत. शिवसेना पक्षाची ताकद वाढवण्यासाठी युवकांची फळी जोमाने काम करत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये युवासेनेमध्ये येणार्यांची संख्या वाढली आहे. युवासेनेच्या शाखांमधून तरुणांसाठी विकासगंगा आणली जाणार आहे. तरुणांना एकाच छताखाली आणण्यासाठी गाव तिथे युवकांची शाखा अशी मोहिम हाती घेतली आहे. त्याचा आरंभ झाला असून लवकरच त्याची अंमलबजावणी झालेली पहायला मिळेल. यासाठी युवासेना तालुका प्रमुख चांगले काम करत आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींमध्ये युवासेनेची शाखा उभारली जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रभावामुळे युवकांना एका छताखाली आणणे शक्य झाले आहे. या शाखा विकासाचे दालन ठरतील.
- -तुषार साळवी, युवासेना तालुका प्रमुख