रत्नागिरीत कर्जदाराकडून अव्वाच्या सव्वा व्याज उकळणाऱ्या सावकारावर कारवाई

रत्नागिरी:- जादा व्याज आकारून वसूलीसाठी कर्जदाराला मारण्याची धमकी देणाऱ्या मान्यताप्राप्त सावकार लिना शिर्के, रोहन शिर्के यांच्या घरावर छापा टाकून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने कागदपत्रे जप्त केली आहे. चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्या फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

या विरोधात कर्जदाराने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. जिल्हा उपनिबंधक यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली. या समितीने शिर्के यांच्या घरावर छापा टाकला यावेळी त्यांना आक्षेपार्ह कागदपत्र आढळून आली आहेत.