रत्नागिरीत आषाढी एकादशी साधेपणाने साजरी

रत्नागिरी:- प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीत आषाढी एकादशी अत्यन्त साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून एकादशी साजरी करण्यात आली. कोरोनाचे संकट लवकरात लवकर संपु दे असे साकडे विठुराया चरणी घालण्यात आले. 
 

प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी शहरात दरवर्षी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा आहे. दरवर्षी रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी मोठ्या संख्येने विठ्ठल दर्शनाकरीता हजेरी लावतात. शहराच्या विविध भागातून वारकºयांच्या दिंड्या विठ्ठल मंदिरात दाखल होतात. मात्र गतवर्षी पासून कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशी अत्यंत साधेपणाने साजरी केली जात आहे. 
 

मंगळवारी देखील सध्या पद्धतीने आषाढी एकादशी अत्यंत साध्यापणाने साजरी करण्यात आली. आषाढी एकादशीदिवशी विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे चार वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमांचा प्रारंभ झाला. मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक विधी करण्यात आले. पहाटे ४ ते ५ या कालावधीत विठुरायाचा पुरोहीतांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. ५ ते ६ या वेळेत काकड आरती करण्यात आली.