रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे तीन खासगी हॉस्पीटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची व्यवस्था अधिक प्रमाणात करता येणार आहे.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एकुण 19 कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. त्यात शासकीय कोवीड केअर सेंटर 16 असून 3 खासगी सेंटर आहेत. या ठिकाणी 1 हजार 320 बेडस् असून त्यात 720 कोवीड रुग्ण उपचार घेत आहेत. संजीवनी, आयुसिध्दी, छोटू भाई देसाई रुग्णालयाला परवानगी दिली आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यात कोहिनूर हॉटेल आणि मराठा रेसिडेन्सीत व्यवस्था केली आहे. कोवीड 19 ची लक्षणे असलेल्या व्यक्तींना या केंद्रात भरती केले जाते. याठिकाणी दिवसातून तीनवेळा तापमान, ऑक्सीजन पातळी, बीपी तपासला जातो. सहा मिनिट वॉक टेस्ट दिवसातून दोनवेळा होते. यामध्ये प्रथम ऑक्सीजनची तपासणी होते. त्यानंतर सहा मिनिटे चालण्यास सांगतात. पुन्हा ऑक्सीजन तपासतात. 60 वर्षांखालील, कोमॉर्बिंड व लक्षणे नाहीत पण तपासणी पॉझिटीव्ह असेल अशांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले जाते. त्यांच्या तपासणी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका करत आहेत.