एसआरके क्लबचे ४ खेळाडू करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
रत्नागिरी:- तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर तायक्वांडो असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या 8 व्या क्यूरोगी व 5 व्या पुमसे राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीतील चार खेळाडूंची निवड झाली आहे. ही स्पर्धा शिर्डी, जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये रत्नागिरीतील एस आर के तायकांडो क्लब रत्नागिरी येथील स्वरा विकास साखळकर, यज्ञा साईप्रसाद चव्हाण, तुषार नागरदेव कोळेकर आणि आयुष कोळेकर हे खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, सदस्य अजित गार्गे, नीरज बोरसे, सतीश खेमसकर यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याचबरोबर एस आर के क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदेश मयेकर, ॲड. समृद्धी मयेकर, सनी आंबेरकर आणि समस्त पालक वर्ग यांनीही खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहन दिले आहे.









