‘गोष्ट एका कावळ्याची’ शॉर्ट फिल्मला पुरस्कार
रत्नागिरी:- सर्बिया येथे झालेल्या न्यू जनरेशन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रत्नागिरीच्या स्थानिक मुलांनी एकत्र येऊन केलेल्या वाय. पी. प्रॉडक्शनच्या पहिल्याच ‘गोष्ट एका कावळ्याची’ या शॉर्ट फिल्मला हॉनरेबल मेंशन (honorable mention) म्हणजेच विशेष उल्लेखनीय हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा इंटरनॅशनल फेस्टिवल असल्यामुळे संपूर्ण जगभरातून या फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म येत असतात.
जवळपास आठशे शॉर्टफिल्म यासाठी यंदा आल्या होत्या, यातून निवड होऊन कोकणातल्या कलाकारांनी, तंत्रज्ञांनी कोकणचा ठसा सातासमुद्रापार उमटविला आहे. ‘गोष्ट एका कावळ्याची’ या शॉर्टफिल्ममधून कोकणातील गोष्ट कोकणातल्या मुलांनी एका वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. गेली आठ वर्षे नाटक, सिनेमा या क्षेत्रात ही सारी मंडळी कार्यरत आहे. वाय. पी. प्रोडक्शन आणि सिनेरिया फिल्म प्रेझेंट ‘गोष्ट एका कावळ्याची’ या शॉर्ट फिल्मची निर्मिती रोहित म्हात्रे, आरती पोटफोडे यांनी केली आहे. महेश कापरेकर यांची संकल्पना असलेल्या या शॉर्टफिल्मचे लेखन यतीन पवार यांनी केले आहे, तर दिग्दर्शन मंथन खांडके, मनोज भिसे यांनी केले आहे. छायांकन साईप्रसाद पिलणकर, सिद्धराज सावंत, संकलन स्वामी ओमन, निखिल पाडावे यांनी केले तर संगीत मिलिंद गोवेकर यांचे आहे. यामध्ये कश्मिरा सावंत यांनी गायन केले असून तेजश्री पिलणकर हिची रंगभूषा, यामिनी रेडीज यांची वेशभूषा आहे. साई शिरसेकर, स्वरूप शिरसेकर यांची प्रकाश योजना तर सौरभ सावल यांनी ध्वनिमुद्रणाची बाजू सांभाळली आहे. प्रॉडक्शन टीममध्ये स्वप्नील गावडे, सुजित मिस्त्री, प्रथमेश भाटकर, लाईन प्रोडक्शन म्हणून अजिंक्य कोल्हटकर, पोस्ट प्रॉडक्शन म्हणून सुबोध खामकर यांनी काम पाहिले आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये चिपळूणचा बालकलाकार रुद्र बांडागळे याची प्रमुख भूमिका असून स्मितल चव्हाण, मनोज भिसे, संचिता जोशी, वरद चव्हाण यांच्याही यामध्ये भूमिका आहेत. लवकरच वाय. पी. प्रॉडक्शनच्या यूटयूब पेजवर हे शॉर्ट फिल्म प्रदर्शित केली जाणार आहे.
रत्नागिरीमध्ये मुंबई पुण्यासारखी शूट व्हावीत. आणि रत्नागिरीसारखं मुंबई पुण्यामध्ये स्वतःच प्रोडकेशन हाऊस आसावं. म्हणून वायपी प्रोडकशन ची निर्मिती करण्यात आली. निर्मिती पासून संगीत व्हिडीओ, कव्हर व्हिडीओ, हिंदी वेब सिरिस, जाहिराती, मराठी चित्रपट ह्याचं लाईन प्रोडकशन केलं. तसेच कलर्स मराठीचं “सुर नवा ध्यास नवा” ह्याचं देखील लाईन प्रोडकशन केलं. पण ह्या सगळ्यागोष्टी करत असताना आम्ही पहिला नवीन उपक्रम रबिवला तो म्हणजे पहिला पोयेटिक संगीत विडिओ बनवला आणि त्यानंतर मराठी शॉर्ट फिल्म बनवली, “गोष्ट एका कावळ्याची अस निर्माता प्रथमेश भाटकर याने सांगितल.









