रत्नागिरी:- रत्नागिरी शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून काही प्रकल्प हाती घेतले आहेत. जिल्ह्याने देशाला ६ भारतरत्न दिली. त्यांचे १५ ते १८ फुटाचे चेहरे बनविण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मविर संभाजी महाराजांचे भव्य उभे पुतळे उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पहिले ध्यान केंद्र होणार आहे. नागपूरच्या धर्तीवर वॉटर फाऊंटन म्हणजे पाण्याच्या स्क्रिनवर रत्नागिरीचा इतिहास सांगणारा प्रकल्प उभारला जाणार आहे. सुमारे ३० कोटीचे हे प्रकल्प रत्नागिरीच्या पर्यटनाला नवा आयाम देतील, अशी माहिती उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकंत्री उदय सामंत यांनी दिली. वि दा सावरकर नाट्यगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्याने देशाला ६ भारतरत्न दिले आहेत. या ६ रत्नांचे १८ फुटाचे चेहरे बनविण्यासाठी ३ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. जे जे आर्ट ऑप स्कुलची टिम येऊन त्याची पाहणी करणार आहेत. जिजामाता उद्यान, संसारे उद्यानामधील जागेची पाहणी केली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या उभ्या पुतळ्यासाठ दीड कोटी रुपये मंजूर आहेत.
महाराष्ट्रातील पहिले ध्यान केंद्र रत्नागिरीत उभारले जाणार आहे. त्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रत्नागिरीत सुमारे १२ कोटीचा विकास निधी नाविन्य पुर्ण योजनेतून खर्च केला जाणार आहे.
पर्यटनामध्ये आणखी भर पडावी यासाठी नागपूरच्या धर्तीवर रत्नागिरीत वॉटर फाऊंटन उभारण्यात येणार आहे. यामध्ये पाण्याच्या स्क्रिनवर रत्नागिरीचा इतिहास दाखविला जाणार आहे. यासाठी शासनाने २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
जिल्हा नियोजनचा १०० टक्के निधी खर्च झाला आहे. जो काही १७६ रुपये निधी समर्पित झाला आहे. तो तांत्रिक कारणामुळे झाला आहे. गेल्यावर्षी जिल्ह्याचा २७१ कोटीचा विकास आराखाडा होता. पुढील वर्षाचा आराखडा ३०० कोटीची मंजूर झाला आहे. शहरातील टिळक स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार आहे. टिळक ग्रंथालयाचे काम पुर्ण झाले आहे. लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. महाराष्ट्रातील पहिले स्किल सेंटर रत्नागिरीसाठी जाहिर झाले आहे. शिवसृष्टी, झुचा प्रस्ताव हे सर्व प्रकल्प आता पाईपलाईनमध्ये आहेत. यातून रत्नागिरी शहराची विकासात्मक आणि पर्यटनदृष्ट्या घोडेदौड सुरू आहे, असे श्री. सामंत म्हणाले.